Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजउद्योजकाने गमावलेले 20 लाख रुपये परत मिळवून दिले; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

उद्योजकाने गमावलेले 20 लाख रुपये परत मिळवून दिले; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रांजणगाव गणपती (पुणे): आपल्या कंपनीसाठी आवश्यक नवीन मशिन खरेदी करण्यासाठीऑनलाईन सायबर फसवणुकीत एका उद्योजककाने गमावलेली सुमारे २० लाख रुपये रक्कम संबंधित उद्योजकाला पुन्हा मिळवून देण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.

याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक सुहास पंढरीनाथ मलगुंडे, रा. ढोकसांगवी, ता. शिरूर यांची डी एसव्ही पॉलिमर्स या नावाची कंपनी रांजणगाव एमआयडीसीमध्ये असून, या कंपनीसाठी नवीन मशिन खरेदी करण्यासाठी मलगुंडे यांनी ईझूमी ऍडव्हान्स प्रोसेसिंग टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संपर्क साधला. मलगुंडेंचा संबंधित कंपनीशी झालेला पत्रव्यवहार मिळवून त्रयस्थ व्यक्तीने संपर्क साधून या ई मेल मधील कंपनीचे नाव, संपर्क क्रमांक आणि मशिन एकसारखेच होते, केवळ त्यातील एक दोन आकडे वेगळे होते. हे आणखी एखादे खाते कंपनीचे असावे असे मलगुंडे यांना वाटल्याने त्यांनी तात्काळ सुमारे २० लाख त्या खात्यावर पाठविले.

त्यानंतर त्वरित संबंधित कंपनीच्या सेल्समनशी संवाद साधला. मात्र ते खाते ईझूमी कंपनीचे नसल्याचे समजल्यानंतर मलगुंडे यांनी ही बाब रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना कळविली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल किशोर शिवणकर यांसह सायबर पोलिस पथकाने तपास हाती घेतला. या तपास पथकाने तातडीने तपासाचे चक्र फिरवत ज्या बँकेत पैसे पाठविले त्या बँकेशी ऑनलाईन पत्रव्यवहार करुन संबंधित रक्कम थांबविण्यास सांगितली.

त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर ही रक्कम उद्योजक मलगुंडे यांना परत केली असल्याचे पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments