इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली : जर तुमचं बँकेत काही काम असेलतर ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती असणार आहे. साधारणपणे बँका महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी (असल्यास) खुल्या असतात. तर आरबीआयच्या आदेशानुसार, महिन्याच्या सर्व दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच सर्व रविवारी बँका बंद राहतील. मात्र, उद्या महिन्याचा तिसरा शनिवार असला तरीही बँकांना सुट्टी असणार आहे.
देशाच्या ईशान्य राज्य मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये बँका बंद राहतील. मणिपूरमध्ये नागा समुदायाचा लोई-नागाई-नी हा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मणिपूर राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बँका, सरकारी कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयेही बंद राहणार आहेत.
अशा परिस्थितीत तुम्ही जर इम्फाळ किंवा त्याच्या लगतच्या कोणत्याही शहरात राहत असाल तर बँकेचे काम आता तुम्हाला सोमवारीच पूर्ण करावे लागणार आहे. असे जरी असले तरी उद्या देशाच्या इतर भागात बँकेचे कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे. याशिवाय, बँकेच्या सुट्यांबाबत काही माहिती हवी असल्यास तुम्हाला जवळच्या बँकेत जावे लागणार आहे. असे जरी असले तरी महाराष्ट्रात या सुट्यांचा परिणाम होणार नाही.