Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजउद्धव ठाकरे यांची भेट न झाल्यामुळे महिला आघाडी संतप्त

उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्यामुळे महिला आघाडी संतप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

छत्रपती संभाजीनगर – दोन तासापासून उभे असताना उद्धव ठाकरेना भेटू दिले जात नसल्याने शिवसेना महिला आघाडीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रोष व्यक्त हाँटेल सोडले. पुरुष पदाधिकारी भेटतात, पण महिलांविषयी दुजाभाव का असा प्रश्न यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी केला.

शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे मंगळवारपासून छत्रपती संभाजीनगरातील हॉटेल रामा मध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे महिला आघाडीच्या पदाधिकारी सकाळी ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते.

यावेळी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांची भेट होऊ दिली जात नसल्याने महिला आघाडीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी सकाळी तीव्र नाराजी व्यक्त केली. मतदान हवे असेल, कार्यक्रम घ्यायचे असतील तर महिला आघाडी आठवते. परंतु नेत्यांना भेटायचे असेल तर मात्र फक्त प्रमुख पदाधिकारीच भेटतात.

तिथे महिला आघाडीला डावलले जाते, असा आरोप यावेळी करण्यात आला. उद्धव ठाकरे मुक्कामी थांबले आहेत तिथे आज सकाळपासून शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडीची पदाधिकारी जमलेले आहेत.

मात्र उद्धव ठाकरे सकाळपासून कुणालाही भेटलेले नाहीत. नेते संजय राऊत हे पक्षाच्या स्थानिक पुरुष पदाधिकाऱ्यांना भेटले. महिला आघाडीच्या नेत्यांनी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनीही महिला पदाधिकाऱ्यांना प्रतिसाद दिला नाही.

त्यामुळे या महिला पदाधिकाऱ्यांचा राग अनावर झाला. त्यांनी हॉटेलमध्येच ओरडाओरडा करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी माजी महापौर कला ओझा, सुनिता आऊलवार, प्रतिभा जगताप, सुनिता देव, मीरा देशपांडे, अंजली मांडवलकर यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments