इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवड : पुरंदर तहसील कार्यालयामध्ये गुरुवार १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी पुरंदर तहसील कार्यालयांमधील नेटवर्क इंजिनियर पवन कालिदास दुधाळ यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत, नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी, महसूल नायब तहसीलदार मिलिंद घाडगे, मंडलाधिकारी, गाव कामगार तलाठी, कोतवाल तसेच आधी उपस्थित होते. तहसील कार्यालयातील महसूल विभागामध्ये काम करीत असताना अधिकारी वर्ग तसेच शेतकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना त्या त्या विषयांमध्ये तात्काळ सहकार्य दुधाळ यांच्याकडून होत असते.
त्याचबरोबर सर्व क्षेत्रातील नागरिकांना प्रामाणिक न्याय दुधाळ यांच्याकडून मिळत असल्यामुळे त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित केल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. दुधाळ यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षात होत आहे.