Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजउच्च रक्तदाब करता येऊ शकतो नियंत्रणात; 'या' गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे...

उच्च रक्तदाब करता येऊ शकतो नियंत्रणात; ‘या’ गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : सध्या रक्तदाब, मधुमेहाची समस्या अनेकांना जाणवू शकते. त्यात उच्च रक्तदाब नियंत्रणात आणता येऊ शकतो. त्यासाठी आपल्या जीवनशैली आणि खाण्या-पिण्याकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. उच्च रक्तदाब ही एक वाढती गंभीर आरोग्य समस्या आहे जी जेव्हा रक्तदाब सातत्याने 130/80 मिमी एचजी किंवा त्याहून अधिक असते तेव्हा उद्भवते. याला ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते.

कोणत्याही वयात तुम्ही तुमच्या रोजच्या सवयी बदलून रक्तदाब नियंत्रित करू शकता. काही लोक जीवनशैली सुधारून किंवा औषधे घेऊन त्यांचा रक्तदाब नियंत्रित करू शकतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे उच्च रक्तदाब कसा रोखायचा आणि नियंत्रित कसा करायचा याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

त्यात दररोज व्यायाम करावा. दररोज 5 मिनिटे शारीरिक क्रियाकलाप अर्थात जास्तीत शारीरिक हालचाली कराव्यात. आठवड्यातून 5 दिवस असे करावीत. जर तुम्ही धूम्रपान करत असाल ते तर टाळणं गरजेचे आहे. यामुळे रक्तदाब वाढू शकतो. संतुलित आहार घेणेही गरजेचे आहे. कमी मीठ (सोडियम) आणि अल्कोहोल मर्यादित करा. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. ध्यान आणि विश्रांती ही गरजेचे आहे. याने रक्तदाब नियंत्रणात आणता येऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments