Tuesday, July 15, 2025
Homeक्राईम न्यूजउच्चशिक्षित मुलीचा प्रेमविवाह, कुटुंबियांना कळताच घडलं भयंकर; वाचा सविस्तर...

उच्चशिक्षित मुलीचा प्रेमविवाह, कुटुंबियांना कळताच घडलं भयंकर; वाचा सविस्तर…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सातारा: सातारा तालुक्यातील एका गावात मुलीने प्रेमविवाह केल्याने नैराश्यातून आईने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय उच्चशिक्षित मुलीने गावातीलच एका तरुणासोबत पळून जाऊन विवाह केल्यानंतर आलेल्या नैराश्यातून तिच्या आईने विष प्राशन करून आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती रात्री अचानक घरातून बेपत्ता झाली. घरात खळबळ उडाली. नातेवाईकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती एका युवकासोबत पळून गेल्याची चर्चा गावात सुरू झाली. हे समजताच आईला जबर मानसिक धक्का बसला आणि नैराश्यातून पहाटे विषारी औषध प्राशन केलं.

आईला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या जीवन-मरणाशी झुंज सुरू असतानाच, मुलगी नवविवाहित पतीसोबत सातारा तालुका पोलिस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी संबंधित कुटुंबियांना फोन करून माहिती दिली असता, “आईने विष प्राशन केलंय, आम्ही पोलिस ठाण्यात येऊ शकत नाही,” असं कळवण्यात आलं.

आई रुग्णालयात उपचार घेत असतानाच तिने प्राण सोडले. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिस तपासात समोर आलं की, मुलीचे युवकासोबत सहा महिन्यापासून प्रेमसंबंध होते आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी गुपचूप विवाह केला होता. घरच्यांना न सांगता ती घरातून निघून गेली, हे आईला सहन झालं नाही. घरगुती तणाव, सामाजिक दबाव आणि मानसिक ताण यामुळे आईने टोकाचं पाऊल उचललं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments