Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजउंब्रज येथील बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश

उंब्रज येथील बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

येथील बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले असुन एक बिबट्या शुक्रवारी (ता.१५) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जेरबंद करण्यात आल्याची माहिती ओतुर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

तीन दिवसां पुर्वी आयुष सचिन शिंदे या साडेतीन वर्षीय बालकास बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या वतीने उंब्रज परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १० पिंजरे, ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच वनविभाग व रेस्क्यु टीमचे ३० सदस्य या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी स्वतः उंब्रज येथे भेट देऊन ग्रामस्थांच्या व्यथा जाणुन घेतल्या होत्या तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्यांनी वनविभागाला त्या प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. १० पिंजऱ्यांपैकी एका पिंजऱ्यात शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. सदर बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले आहे.

उंब्रज परिसरातील सर्व बिबटे पकडण्याची मागणी वनविभागाला ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments