Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार...

ईडी, सीबीआयचा वापर करून लोकशाहीवर घावः शरद पवार यांची महायुतीवर जोरदार टीका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ‘मोदी गॅरंटी’ अशी जाहिरात करत आहेत. मात्र, त्यामधील एकही आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केलेले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली. ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा वापर करून लोकशाहीच्या मूल्यांवर घाव घालणाऱ्यांना सत्तेतून दूर करता यावे यासाठी इतर सर्व विचारधारा जागृत करण्यासाठी एकजुटीने काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा काँग्रेस भवन येथे पार पडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सचिन आहिर, आपचे खासदार सुप्रिया सुळे, चंद्रकांत हंडोरेंसह पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments