Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजइमारतीतील दुचाकी चोरीस ; घटना CCTV मध्ये कैद

इमारतीतील दुचाकी चोरीस ; घटना CCTV मध्ये कैद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाघोली : वाघोली येथील संत तुकाराम नगर परिसरातील गावडे इमारतीत एका चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना सी सी टीव्ही मध्ये कैद झाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

रात्री पावणे दोनच्या सुमारास एका जण मोबाईलवर बोलत बोलत इमारती समोर आला. त्याने हाफ पँट व हुडी परिधान केलेली होती. फोन वर बोलता बोलता तो गावडे इमारतीच्या पार्किंग मध्ये गेला. एक दुचाकी त्याने तेथून काढली.

तिच्या वर बसून ढकलत ती त्याने पुढे अंधारात नेली. व तो फरार झाला. ही दुचाकी रोशनकुमार पंडरम यांच्या मालकीची आहे. याबाबत त्याने लोणीकंद पोलीसात फिर्याद दिल्याचे कळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments