Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज इतके वर्ष वरिष्ठांचे ऐकले आता माझे ऐकाः उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बारामतीकरांना...

इतके वर्ष वरिष्ठांचे ऐकले आता माझे ऐकाः उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बारामतीकरांना आवाहन, म्हणाले-मी उमेदवार देईल त्याला मतदान करा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मी लवकरच महायुतीचा उमेदवार जाहीर करणार असून मलाच उमेदवार समजून मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले आहे. शेवटची निवडणूक आहे, असे सांगून तुम्हाला भावनिकही केलं जाईल. मात्र कधी शेवटची निवडणूक होईल काय माहिती? असा सवाल उपस्थित करत अजितदादांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

तुम्ही इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझं ऐका. उद्या जर तुम्ही आपल्या विचारांचा खासदार दिला तर मी मोदींना सांगू शकतो. बारामतीकरांनी आपल्या विचारांचा खासदार दिला आहे, आता माझी कामे झाली पाहिजे, असेही अजित पवार यावेळी बोलतांना म्हणाले. अजितदादा पुढे बोलतांना म्हणाले की, मी आजपर्यंत तुम्हाला काहीही मागितलेले नाही, मी फक्त तुम्हाला मत मागतो. मी खासदारकीला जो उमेदवार देणार आहे, त्याच्यासाठी मते मागणार असल्याचे भावनिक आवाहन बारामतीत केले.

अनेक निर्णय धाडसाने घेतले

अजित पवार म्हणाले, काहींना उपाध्यक्ष, अध्यक्ष बनवलं त्यांचं काम जोरात सुरू आहे. शरद पवार गटाकडे परत गेलेले मला मुंबईत भेटले. त्यावेळी त्यांनी मला माझी चूक झाल्याचे सांगितले. परंतु मी अनेक निर्णय हे धाडसाने घेतलेले आहेत. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक असणार आहे. जर तुम्ही मला कौल दिला, तर पुढील कामाला मी बांधील असेल.

इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझे ऐका

स्वच्छता ठेवा, पचापच थुकू नका, फुले तोडू नका, कॅनॉलमध्ये घाण टाकू नका. मला बारामतीला देशात पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळवायचं आहे. आपल्या शब्दाला किंमत आली असून एका व्यावसायिकाने काम करायला एक कोटी दिले. बारामतीतील काम करायला पक्षाचे पैसे घातले. एकीकडे अजित सांगतो आहे आणि एकीकडे वरिष्ठ सांगतो आहे कुणाचे ऐकायचे. इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझं ऐका.

गटातटामुळे त्रास होतोय

अजूनही काही जण कार्यकर्त्यांची जाणीवपूर्वक नावे घेत नाहीत, पण तुमच्या गटा तटामुळे मला त्रास होतो. गट तट मला मान्य नाही. मी एकटा फिरेन, लोकं द्यायचे तेवढे मते देतील, असे म्हणत त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला कानउघडणी केली. कामे करताना मला वाईटपणा घ्यावा लागतो. अशा शब्दात अजित पवारांची कार्यकर्त्यांची कान उघडणी केली.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments