Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजइंदापूर येथे जैन तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन

इंदापूर येथे जैन तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर : इंदापूर येथील श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर प्रांगणात कायोत्सर्ग अवस्थेत असलेल्या तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा सोहळा १५ ते १७ जून या कालावधीत होणार आहे. शनिग्रह अरिष्ट निवारक २७ फूट उंच असलेल्या तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीस १३ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्रेणिक शहा यांनी दिली.

यावेळी बोलताना शहा म्हणाले की, प्रथमाचार्य चारित्र्य चक्रवर्ती १०८ श्री शांतीसागर महाराज यांच्या परंपरेप्रमाणे तसेच गणाधिपती गणाधराचार्य १०८ श्री कुंथूसागर महाराज व प्रज्ञाश्रमण सरस्वताचार्य श्री देवनंदी महाराज यांच्या आशीर्वादाने आर्ष परंपरेचे परम प्रभावशाली युगल मुनिराज १०८ श्री अमोघकिर्ती महाराज व अमरकिर्ती महाराज यांच्या मंगल सानिध्यात या २७ फूट उंच तीर्थंकर भगवान मुनीसुव्रतनाथ मूर्तीचा ३३ मंगलद्रव्यांनी महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न होणार आहे.

या सोहळ्यास राज्यातून हजारो श्रावक श्राविका उपस्थित राहणार आहेत. १५ जून रोजी ध्वजा रोहन, भगवान मुनीसुव्रतनाथ विधान, युगल मुनीराज यांचे प्रवचन तसेच १६ जून रोजी महर्षी विधान, प्रवचन, तर १७ जून रोजी सन्माननीय मान्यवरांच्या सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत रोज दुपारी तीन वाजता महामस्तकाभिषेक होणार आहे.

यानिमित्त प्रतिष्ठाचार्य पंडित दीपक उपाध्ये, महावीर उपाध्ये, दीपक उपाध्ये, संगीत कार सुयोग पाटील यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी किशोरकुमार शहा, डॉ. सतीश दोशी, डॉ. शीतल शहा, सुशील शहा, किरण शहा, सचिन शहा, श्रीमती सुजाता शहा, रमणिकलाल कोठाडीया, बाबूभाई गांधी, मिहिर गांधी, नमन गांधी, प्रिया शहा, श्रेणिक शहा, रमेश वडुजकर, अनिल जमगे, डॉ. रविकिरण शहा, शरद दोशी, इंद्रराज दोशी, नंदकुमार दोशी, रविंद्र गांधी आदी सन्माननीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज, श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था तसेच मुंबई येथील श्री वीरशासन प्रभावना ट्रस्ट हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. तर श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट चे सर्व विश्वस्त यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

या धार्मिक कार्यक्रमात विविध ३७ प्रकारच्या धार्मिक सेवा क्रिया होणार असून ज्यांना या कार्यक्रमात सक्रिय योगदान द्यायचे आहे. त्यांनी मंदिर ट्रस्टच्या इंदापूर जनता सहकारी बँकेच्या (IFSC JSBP0000032), सेव्हींग खाते क्रमांक 032220100018718 या खात्यावर दान निधी पाठवावा, असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments