इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
संतोष पवार / पळसदेव : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारीपतसंस्थेच्या सभापतीपदी संगिता सुरेश पांढरे, तर उपसभापतीपदी भारत तात्याराम बांडे यांची बिनविरोध निवड झाली. तज्ञ संचालकपदी जयभारती मोरे व बाळासाहेब महानवर यांची निवड झाली. पतसंस्थेचे मावळते सभापती शशिकांत शेंडे व उपसभापती भाऊसाहेब वणवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
सभापती व उपसभापती निवडीसाठी संचालक मंडळाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारीत वेळेत सभापती पदासाठी संगिता पांढरे व उपसभापती पदासाठी भारत बांडे यांचेच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. ही घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एस एस कदम यांनी केली.
शिक्षक पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना सोबत घेऊन पारदर्शी व आदर्शवत कामकाज करणार असल्याचे पांढरे यांनी स्पष्ट केले. यावेळी नानासाहेब नरुटे, दत्तात्रय तोरसकर, आदिनाथ धायगुडे, दत्तात्रय ठोंबरे, सतिश दराडे, शशिकांत शेंडे, अंबादास नरुटे, अनिल रूपनवर, सुहास मोरे, सचिन देवडे यासंह विविध संघटनाचे पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते.