Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजइंदापूरातील कट्टर विरोधक एकाच व्यासपिठावरः अजित पवारांच्या समवेत भरणे मामा अन्...

इंदापूरातील कट्टर विरोधक एकाच व्यासपिठावरः अजित पवारांच्या समवेत भरणे मामा अन् हर्षवर्धन पाटलांनी घेतली सेल्फी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर तालुक्यातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे कट्टर विरोधक. मात्र, हे दोन्ही नेते आज बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एकाच व्यासपिठावर आल्याने इंदापूरातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. एवढ्यावरच नाही तर काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणारे सोनाई उद्योग समुहाचे प्रवीण माने यांच्यासह पवार, भरणे अन् पाटील यांनी एकत्रित सेल्फी देखील काढला.

इंदापूरच्या राजकारणात हर्षवर्धन पाटील यांची अजित पवार यांनी आजवर कायम कोंडी केली. हे दोघेही एकेकाळी आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे ठेवत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची कायम कोंडी केली.

जिल्हा बँकेच्या माध्यमातूनही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. पाटील यांचे राजकारण संपविण्याचा विडाच अजित पवार यांनी उचलला होता. परिणामी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीच अनेकदा गोची झाली. कारण शरद पवार यांना कन्या सुप्रिया यांच्यासाठी पाटील यांची लोकसभेला मदत घ्यावी लागत होती. त्याही स्थितीत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडलेली नव्हतीच.

दुसरीकडे अजित पवार यांचे समर्थक दत्तात्रय भरणे मामा यांना पदे देत ताकद देण्यात आली. छत्रपती कारखान्याचे चेअरमन, जिल्हा बँकेचे चेअरमन करत पुढे त्यांना विधानसभेला उतरविण्यात आले. त्यातून पाटील यांचे राजकारण जवळपास संपवण्याचा कट रचला गेला.

सतत होणाऱ्या पवारांच्या विरोधाला अखेर हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये दाखल झाले. त्यांचे बरे चालले असतानाच महायुतीत अजित पवार सहभागी झाले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर मोठी अडचणच निर्माण झाली.

सुरुवातीला पाटील यांनी आढेवेढे घेतले. पण आता ते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. आज ते अजित पवार आणि भरणे यांच्यासह व्यासपीठावर आले. तर त्यांनी त्यानंतर एकत्र सेल्फी देखील घेतल्याने सर्व काही आलबेल झाले असे म्हटले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments