Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजइंदापूरमध्ये खासगी बस 30 फूट खाली जाऊन आदळली; दोन्ही टायर फुटल्याने घडली...

इंदापूरमध्ये खासगी बस 30 फूट खाली जाऊन आदळली; दोन्ही टायर फुटल्याने घडली दुर्घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर खासगी प्रवाशी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती. इंदापूर बाह्यवळणापासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत.

टायर फुटल्यानंतर लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसने जोरदार धडक दिली. ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली जाऊन आदळली आहे. या बसमध्ये किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र, या बसमधील 10 ते 11 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस आणि एनएचएआय चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

खासगी बस सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधून पुण्याच्या दिशेने निघाली होती. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, बसचा आणि या खाजगी मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचे मोठे नुकसान झालं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments