Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजइंदापूरमधील विद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न

इंदापूरमधील विद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर : विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर आयोजित इंदापूर परिसरातील शाळांमध्ये इयत्ता दहावी नंतर डिप्लोमा, इंजिनिअरिंग मधील करिअरच्या वाटा व संधी या विषयी मार्गदर्शन व तसेच शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या संकल्पनेतून बुधवारी (दि.12) रोजी तालुक्यातील श्री. केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी, सौ. कस्तुरबा श्रीपती कदम विद्यालय इंदापूर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल डाळज व श्री निळकंठेश्वर विद्यालय लासुर्णे विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी इयत्ता दहावी मधील प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी 85 टक्के वरील मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांना देखील बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. सुजय देशपांडे यांनी डिप्लोमा पॉलिटेक्निक इंजीनियरिंग मधील करिअरच्या वाटा व संधी याविषयी मार्गदर्शन केले तसेच डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयात सुरु असल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

या कार्यक्रमास श्री केतकेश्वर विद्यालयाचे उपप्राचार्य भोंग, सौ. कस्तुरबा श्रीपती कदम विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंगारे, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक जाधव, श्री निळकंठेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक लोंढे, प्रा. सोमनाथ चिकणे, प्रा. अमोल जगताप, प्रा. सदानंद भुसे, प्रा. लक्ष्मीकांत लाकाळ, हर्षवर्धन लोंढे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments