Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज "इंडिया, इंडिया... भारत माता की जय! विश्वचषक ट्रॉफीचे पुणेकरांनी केले ...

“इंडिया, इंडिया… भारत माता की जय! विश्वचषक ट्रॉफीचे पुणेकरांनी केले जल्लोषात स्वागत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : cricket world cup 2023– ढोल ताशांचा गजर, भर पावसात तरुणाईने इंडिया, इंडियाच्या घोषणा देत केलेला जल्लोष, नवोदित खेळाडूंची गर्दी अशा अत्यंत उत्साही वातावरणात पुणेकरांनी मंगळवारी आयसीसी क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीचे जोरदार स्वागत केले. इतिहासात पहिल्यांदाच रॅलीच्या माध्यमातून पुणेकरांना विश्वचषक ट्रॉफी जवळून अनुभवता आली.

पुणे शहरात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियम गहुंजे येथे आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे पाच सामने खेळविण्यात येणार आहेत. १९ ऑक्टोबरला पुण्यात विश्वचषक स्पर्धेतील भारत-बांगलादेश हा पहिला सामना रंगणार आहे. त्यानंतर चार सामने याच मैदानावर खेळवण्यात येतील. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्या मान्यतेने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने पुणेकरांना ही ट्रॉफी पाहता यावी यासाठी जेडब्ल्यू मेरिएट हॉटेल ते कृषि महाविद्यालय अशी या ट्रॉफीची मिरवणूक काढण्यात आली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, यंदाची विश्वचषक स्पर्धेतील पाच सामने पुण्यात होत आहेत. त्यामुळे पुढील एक ते दीड महिना सगळीकडे क्रिकेटमय वातावरण असणार आहे. या स्पर्धेत सर्वसामान्य पुणेकरांना सामावून घेण्यासाठी विश्वचषक रॅलीचे आयोजन करण्यात आले. आयसीसी – बीसीसीआयकटे आग्रह केल्यानंतर पुण्याला विश्वचषकाच्या ट्रॉफीची रॅली काढण्यास परवानगी मिळाली. प्रत्येक पुणेकराला विश्वचषक पाहता यावा, त्यासोबत छायाचित्र घेता यावे हा या रॅलीचा उद्देश होता.

मंगळवारी सिम्बायोसिस महाविद्यालय, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय अशी विश्वचषक ट्रॉफीची रॅली काढण्यात आली. यावेळी महाविद्यालयीन तरुणाई रस्त्यावर उतरल्यामुळे प्रचंड उत्साही वातावरण होते. नवोदित क्रिकेटपटू दुपारी बारा वाजल्यापासून रस्त्यावर होते. फर्ग्युसन महाविद्यालयाजवळ प्रचंड पाऊस असतानाही तरुणाईने पावसात ट्रॉफीचे स्वागत केले.

RELATED ARTICLES

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

Recent Comments