Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजइंडियाज गॉट लेटेंट "प्रकरण; रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलानीचां सायबर सेल समोर जबाब

इंडियाज गॉट लेटेंट “प्रकरण; रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलानीचां सायबर सेल समोर जबाब

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : “इंडियाज गॉट लेटेंट” या शोमध्ये अश्लील कमेंट्स प्रकरणी आरोप असलेले लोकप्रिय युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांनी अखेर महाराष्ट्र सायबर पोलिसांसमक्ष जबाब नोंदवला आहे. दोघेही सायबर सेलच्या नवी मुंबई येथील कार्यालयात हजर झाले होते यावेळी महाराष्ट्र सायबरनं सुमारे 2 तास दोघांचेही जबाब नोंदवले आहेत.

महाराष्ट्र सायबर सेलने रणवीर अलाहाबादिया याला समन्स बजावून 24 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र सायबर सेलचा त्याच्याशी संपर्क होत नसल्यास सांगितलं जात होतं. अखेर महाराष्ट्र सायबर सेलच्या मुख्यालयात उपस्थित राहत आपला जबाब अलाहाबादिया याने नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान महाराष्ट्र सायबरनं या प्रकरणात आतापर्यंत 40 जणांना चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. यामध्ये आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून “इंडियाज गॉट लेटेंट” या शोमध्ये आई-वडिलांबाबत अश्लील टिप्पणी केल्यापासून रणवीर अलाहाबादिया चर्चेत आहे. चोहीकडून त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. या प्रकरणात रणवीर अलाहाबादियानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, रणवीरला न्यायालयानं दिलासा दिला, त्याची अटक थांबवण्यात आली आणि त्याला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार त्यांना बजावलेल्या समन्सनुसार महाराष्ट्र सायबर सेलच्या कार्यालयात पोहोचत जबाब नोंदवला असून त्यांच्या विरोधात पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments