Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज इंजिनीअर नोकरी शोधायला गेला अन् सात लाख गमावून बसला

इंजिनीअर नोकरी शोधायला गेला अन् सात लाख गमावून बसला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का, अशी विचारणा करून सॉफ्टवेअर इंजिनीअरला टास्क दिला. त्यासाठी सुरुवातीला मोबदला दिला. त्यानंतर मोठा टास्क देऊन ऑनलाइन पद्धतीने रक्कम भरण्यास भाग पाडून सात लाख तीन हजार २७० रुपयांचा गंडा घातला. थेरगाव येथे २८ ते २९ सप्टेंबर या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.

स्वप्निल व्यंकटराव सुभेदार (३०, रा. थेरगाव) यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. २) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार टेलिग्राम आयडीधारक देव, व्हिना नायर आणि व्हॉट्सअॅप क्रमांकधारक तसेच विविध बँकांचे खातेधारक असलेल्या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

फिर्यादी स्वप्निल सुभेदार सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. बेरोजगार असल्याने ते नोकरीच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी वेबसाईटवर नोकरीसाठी अर्ज केला. त्यानंतर संशयितांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज पाठवला. ‘तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का?’ अशी विचारणा केली. स्वप्निल यांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर संशयितांनी त्यांना टेलिग्रामद्वारे टास्क दिला. रिव्ह्यू देण्याचा एक टास्क पूर्ण केल्यानंतर स्वप्निल यांना दीडशे रुपये दिले.

त्यानंतर टास्कचा मोबदला म्हणून आणखी काही पैसे त्यांना ऑनलाइन पद्धतीने दिले. त्यानंतर जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून पुढील टास्कसाठी काही रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार स्वप्निल यांनी त्यांच्याकडील रक्कम भरली. तो टास्क पूर्ण झाला असून, त्याची रक्कम काढण्यासाठी आणखी दुसरा टास्क पूर्ण करावा लागेल, त्यासाठी काही रक्कम गुंतवणूक करावी लागेल, असे संशयितांनी सांगितले. त्यानुसार विविध बँकांच्या खात्यांवर आणखी काही रक्कम भरली. त्यासाठी त्यांनी पत्नी तसेच मित्रांकडून पैसे घेतले. एकाच दिवसात त्यांनी सात लाख ३ हजार २७० रुपये भरले. त्यानंतरही संशयितांनी त्यांना मोबदल्याची रक्कम किंवा त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत दिली नाही. पोलिस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे तपास करीत आहेत.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments