Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजआशिष येरेकर पीएमपीचे नवे अध्यक्ष, संजय कोलते यांची बदली

आशिष येरेकर पीएमपीचे नवे अध्यक्ष, संजय कोलते यांची बदली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित, पुणे अर्थात पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थांपकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी सोमवारी (दि. १) काढले आहेत. सध्याचे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांच्याकडून आशिष येरेकर कार्यभार स्वीकारतील.

सन २०१८ चे आयएएस अधिकारी असणारे आशिष येरेकर हे ६ मे २०२२ रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रूजू झाले होते. त्यापूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी नगरला जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून कामकाज पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments