Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजआळे येथे पार पडली रेडा समाधी यात्रा महोत्सवाच्या नियोजनाची मिटींग

आळे येथे पार पडली रेडा समाधी यात्रा महोत्सवाच्या नियोजनाची मिटींग

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणुन ओळख असलेली व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या रेडा समाधी यात्रा महोत्सव दि.४ मे पासुन सुरू होत आहे. वार्षिक यात्रेच्या नियोजनाची मिटींग येथील मंदिरात पार पडली आहे.

यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष संदीप निमसे, यात्रौत्सव कमेटीचे अध्यक्ष गणेश शेळके, कार्याध्यक्ष एकनाथ कु-हाडे, धनंजय काळे, नीलेश पिंगळे, अमोल भुजबळ, अविनाश कुन्हाडे, व्यवस्थापक कान्हू पाटील कुन्हाडे, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर, प्रसन्न डोके, नवनाथ निमसे, विलास शिरतर, संतोष कुन्हाडे, जीवन शिंदे, म्हतु सहाने, पांडुरंग डावखर, संजय गाढवे, सुनील जाधव, गणेश शेळके, संदीप पाडेकर, होनाजी गुंजाळ, ज्ञानेश्वर गाढवे, दिनकर राहिंज, संतोष डावखर, निलेश भुजबळ आरोग्य विभाग, महावितरण कंपनी, पोलीस प्रशासन, एस.टी . महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

यावर्षी चैत्र वद्य दशमी दि.३ मे रोजी श्रींचा अभिषेक व दु २ ते ६ भजन महोत्सव, चैत्र वद्य एकादशी दिवशी शनिवार दि.४ एप्रिल रोजी सकाळी पहाटे ५ वाजता शासकीय महापूजा तहसीलदार रविंद्र सबनिस यांच्या हस्ते सपंन्न होणार असून दु १२ ते ५ ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन होणार असून संध्या ११ ते ५ तुकाईमाता विठ्ठल भक्त प्रासादिक भजनी भारुड मंडळ राजूरी यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दि.५ एप्रिल रोजी सकाळी महापूजा होणार असून संतवाडी, कोळवाडी, डावखरवाडी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद चे आयोजन करण्यात आलेले आहे. दुपारी ४ ते ८ कुस्त्या चा जंगी आखाडा आयोजित केला असून रात्री ९ ते ११ विशाल महाराज हाडवळे यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.६ मे रोजी ह.भ.प. सुदाम महाराज बनकर यांचे काल्याच्या किर्तणाने यात्रेची सांगता होणार आहे.

आळे येथील श्री ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधीचे वैशिष्ट्य असे बाकी यात्रांप्रमाणे ह्या यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रम नसतात किंवा तमाशा चे कार्यक्रम नसतात किंवा बैलगाडा शर्यती नसतात. ही यात्रा पूर्णपणे धार्मिक धर्तीवर आयोजन केले जाते. ह्या यात्रेत प्रापंचिक सर्वच घरगुती वस्तू, कपडे यांचे विविध पाल, रेवड्या- शेव, भेळ, वडापाव विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, कलिंगडाचे स्टॉल्स, आईस्क्रीम-थंड शीतपेय यांचे स्टॉल्स असतात.

त्यावर यात्रेत येणाऱ्या यात्रेकरू ची मांदियाळी असते. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तिपर्यंत आकर्षण असलेले विविध पाळणे, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम मिनी सर्कस, मौत का कुवा असे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते.

पुणे मुंबई येथे नोकरी व्यवसाय निमित्त स्थित असलेली मंडळी आपल्या संपूर्ण परिवारासह यात्रेचा आनंद लुटण्यासाठी हजर राहतील शिवाय मोठ्या प्रमाणात गर्दीही होण्याची शक्यता व्यक्त केली.

सहायक पोलीस निरीक्षक यांनी यात्रा कमिटी सदस्यांना असे आवाहन केले की पार्किंग साठी जास्तीत जास्त जागा मंदिरापासून ५०० मी पुढील क्षेत्रात जागा उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. कुठेही कायदा-सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होणार नाही. पोलीस राखीव पोलीस दल यांना ४ दिवस बंदोबस्तासाठी तात्पुरती पोलीस चौकीची उपलब्धता करून देण्यात यावी.

तसेच मंदिर परिसराचा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कव्हरेज खाली घेण्यात यावा त्या संदर्भातील सीसीटीव्ही नियंत्रण खाली क्षेत्र असल्याचे फ्लेक्स लावण्यात यावे. स्टॉल्स -पाल यांच्यात वेळोप्रसंगी होणाऱ्या वादविवाद टाळण्यासाठी पर्यायी कमिटी व्यवस्था आयोजन करण्यात यावे. तसेच आकाश पाळणा किंवा इतर विविध पाळणे यामुळे दुर्घटना होऊ नये यासाठी पाळणे चालक यांच्याकडून नादुरुस्त असल्याचे निश्चित करण्यात यावे.

तसेच गावपातळीवर येणाऱ्या विविध स्थानिक प्रतिष्ठित ग्रामस्थ, कमिटी मेम्बर यांची सर्वांची माहिती असणारी व्यक्ती पोलीस प्रशासनाला मदतगार म्हणून ४ दिवस माहिती देण्यासाठी सोबत असावी. तसेच विविध सूचना देण्यासाठी पोलीस प्रशासनाला माईक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

मंदिर परिसरात ब दर्जा प्राप्त झाल्यानंतर जवळपास २ करोड रुपयांची विविध मंदिर विकास कामे झाली असुन अहिल्या देवी होळकर या नावाने सुरू केल्याच्या तिर्थक्षेत्र विकासा कामांमधुन ३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासण दरबारी दाखल केला आहे व यात्रा कमिटीने नागरिकांना यात्रेसाठी उपस्थित राहून यात्रेचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.

फोटो- आळे येथील श्री क्षेत्र रेडा समाधी यात्रौत्सवाच्या नियोजनाच्या बैठकी प्रसंगी बोलताना आळेफाटा ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments