इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : तीर्थक्षेत्र आळंदीतील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देहू फाटा परिसरातील एका संस्थेत 15 वर्षीय विद्यार्थ्यांकडे संगीत विषयाच्या शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महेश पोपट नरोडे आणि गौरव दत्तात्रय माळी या दोघांवर दिघी पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांमुळे आळंदीची प्रतिष्ठा डागळली असल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या घडलेल्या घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांने संस्थाचालकाला ही बाब सांगितली, मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. अखेर विद्यार्थ्याने दिघी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गेल्या काही महिन्यापासून आळंदी आणि परिसरात वारकरी शिक्षण संस्थांमध्ये अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. या खाजगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या संस्थावर तातडीने कठोर करावी करावी अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे. आता यावर प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या घडलेल्या घटनेची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून 48 तासात अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्थावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने विशेष पथकाद्वारे सर्वेक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. या घटनेवर आता प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.