Saturday, January 11, 2025
Homeक्राईम न्यूजआळंदीत महाराजाचा दोन विद्यार्थ्यांवर बलात्कार; महिलेने केली मदत, वारकरी संप्रदायात खळबळ

आळंदीत महाराजाचा दोन विद्यार्थ्यांवर बलात्कार; महिलेने केली मदत, वारकरी संप्रदायात खळबळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आळंदी : आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्यादोन अल्पवयीन वारकरी साधक विद्यार्थ्यांवर सोबत राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय महाराजाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत नराधम महाराजाला एका महिलेने मदत केल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी (दि. ४) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपीविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. महेश नामदेव मिसाळ (वय २८ वर्षे रा. खोकरमोहा, ता. शिररकासार, जि. बीड) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, साथीदार महिला आरोपी वरील आरोपाचा तपास सुरू असून तिला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे

आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला वारकरी शिक्षण देणारी खाजगी ज्ञानेश्वरी गुरुकुल या नावाने संस्था आहे. येथे अल्पवयीन मुले वारकरी शिक्षण घेत आहेत. तर त्या संस्थेत आरोपी हा देखरेखीच काम पाहत होता. शनिवारी मध्यरात्री आरोपी हा पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला. दरम्यान ही मुले झोपली असताना आरोपीने त्यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.

याबाबत सदर महिलेला समजल्यावर तिने प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला. मुलांनी याबाबत आपल्या आईला सांगितल्यावर सदर प्रकार उघडकीस आला असून मुलाच्या आईने फिर्याद दिल्यावर महराजाला गजाआड करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षण भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments