इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : बारामतीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आर्थिक कारणावरुन झालेल्या वादातून एका 27 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण शास्त्राने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित गाडेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित याचा आर्थिक देवाण-घेवाणीवरून सोरटेवाडी येथीलच माने नामक व्यक्तीशी वाद झाला होता. त्यातूनच काल शनिवारी (5 एप्रिल) ला मध्यरात्री सोरटेवाडी जवळ आरोपीनं रोहित गाडेकर याच्या छातीवर आणि मानेवर तीक्ष्ण शास्त्राने वार केले. या घटनेत रोहित गंभीर जखमी झाला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी अजून फरार आहे. वडगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत.