Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजआर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात मागील 17 वर्षापासून फरार आरोपी सीआयडीकडून जेरबंदः 2007 मध्ये...

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात मागील 17 वर्षापासून फरार आरोपी सीआयडीकडून जेरबंदः 2007 मध्ये सिताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नागपूर येथील समता सहकारी बँकेतील गुंतवणुकदारांची तब्बल १४५.६० कोटी रुपयांचा अपहार करुन आर्थिक फसवणुक केल्याने एकूण ५७ आरोपी विरुध्द गुन्हा दाखल अाहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला आरोपी विजयकुमार रामचंद्र दायमा हा फेअर व्हिव सोसायटी, गोदावरी होमस, गायत्रीनगर, हैद्राबाद, तेलंगणा याठिकाणी राहत असल्याची माहिती पुणे गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांना मिळाली होती. त्यानुसार, मागील १७ वर्षापासून फरार असलेला संबंधित आरोपी सीआयडीच्या जाळ्यात अडकला आहे.

सीआयडीने दिलेल्या माहितीनुसार, याबाबत नागपूर मधील सिताबर्डी पोलिस ठाण्यात सन २००७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे. समता सहकारी बँक, नागपूर येथील विविध अधिकारी, कर्मचारी, बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, कर्जदार आरोपी व अमन हेमानी, राजश्री हेमानी यांनी सन १९९७ ते २००७ या कालावधीत अपअपसात संगनमत करुन बँकेचे खातेदार व गुंतवणुकदार यांची १४५,६० कोटी रुपयांचा अपहार करुन आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी एकूण ५७ आरोपी विरुध्द गुन्हा दाखल असून त्याचा तपास गुन्हे अन्वेष्ण विभाग, नागपूर करत आहे. या गुन्हयातील फरारी आरोपी विजयकुमर दायमा हा गुन्हा दाखल झाल्यापासून स्वतःचे अस्तित्व लपवून पुणे, मुंबई, नागपूर व तेलंणा येथे राहत होता. त्याबाबत नातेवाईकांकडे पोलिसांनी शोध घेऊन देखील तो मिळून येत नव्हता. सदर आरोपी हा बैठकेजा कर्जदार असताना त्याने समता बँकेकडून कोणत्याही प्रकारचे तारण सिक्युरीटी न देता बिल्स सूटसुविधा प्राप्त करुन कर्जाची परतफेड न करता बँकेतील व्यवस्थापक व इतर यांना हाताशी धरुन बँकेतून कपट बुध्दतीने आर्थिक प्राप्ती करुन फसवणुक केली अाहे. त्याच्या विरुध्द न्यायालयाने देखील एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केले. जाहीरनामे प्रसिध्द करुन देखील तो न्यायालयात हजर न होता, स्वतःचे अस्तित्व लपवून फरार होता.

मागील १७ वर्षापासून त्याचा शोध घेण्यात येत असताना तो हैद्राबाद येथे राहत असल्याची माहिती पुणे सीआयडी पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खातरजमा करुन सापळा रचून त्यास अटक केले अाहे. त्याला पुढील तपासासाठी नागपुर गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपुर्द करण्यात अाले अाहे. सदरची कारवाई सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळल पोलिस अधीक्षक वैशाली माने यांचे नृत्वात पोलिस निरीक्षक अानंद रावडे, पो.हवा. विकास कोळी, सुनील बनसोडे, प्रदीप चव्हाण यांनी केली अाहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments