Saturday, June 14, 2025
Homeक्राईम न्यूजआरोपी दत्ता गाडेने वर्षभरात तब्बल 'येवढ्या' वेळा बघितले अश्लील व्हिडीओ; पोलीस तपासातून...

आरोपी दत्ता गाडेने वर्षभरात तब्बल ‘येवढ्या’ वेळा बघितले अश्लील व्हिडीओ; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती आली समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुण्यातील स्वारगेट बस स्थानक येथे एका तरुणीवर नाराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे (वय-37 वर्ष, रा. गुनाट, शिरूर) याने स्वारगेट एसटी स्थानकात 25 फेब्रुवारी रोजी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास तरुणीवर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 64 (बलात्कारासाठी शिक्षा), 64 (2) (एम) वारंवार बलात्कार आणि 351(2) (धमकावण्याशी संबंधित), 115 (2) (मुद्दामहून दुखापत पोहोचविणे) व 127 (2) (डांबून ठेवणे) या कलमांतर्गत स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.)

या प्रकरणी पुणे न्यायालयात 973 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे (वय-37 वर्ष, रा. गुनाट, शिरूर) याणे जामिन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. या अर्जाला पोलिसांनी विरोध केला असून, त्याची कारणमीमांसा करणारा अर्ज शुक्रवारी पोलिसांनी न्यायालयात सादर केला.

दरम्यान, नराधम आरोपी दत्तात्रय गाडेबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दत्तात्रय गाडेने मागच्या वर्षभरात तब्बल 22 हजार वेळा अश्लील व्हिडिओ पाहिल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकिस आले आहे. आरोपीच्या गुगल सर्च हिस्ट्रीची सायबर तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली असून त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments