Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजआरोपींच्या पोलीस कोठडीत वाढः भाग्यश्री सुडेचा खून करण्यासाठी आरोपींनी खरेदी केलेले साहित्य...

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढः भाग्यश्री सुडेचा खून करण्यासाठी आरोपींनी खरेदी केलेले साहित्य पोलिसांकडून जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लातूर परिसरातील हरंगुळ मुळची रहिवासी असलेली व पुण्यातील वाघोली परिसरात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्री सुर्यकांत सुडे (वय-22) हिचा खून करण्यासाठी आरोपींनी खरेदी केलेले स्टीकिंग टेप, कारचे काचांना लावऱ्यासाठी खरेदी केलेले काळया रंगाचे मॅग्नेटीक कर्टन्स, मुलीचा मृतदेह खड्डा खोदून पुरण्यासाठी वापरलेले टिकाव, फावडे या गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या आहे. तसेच आरोपींनी भाग्यश्रीचा खूनानंतर तिचे अंगावरील काढून घेतलेले सोन्याची चैन, कानातील टॉप्स, एक पेंडल, मोबाईल फोन, सिमकार्ड देखील जप्त करण्यात आल्याच माहिती पोलीसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्य न्यायालयात सोमवारी दिली. न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांची वाढ केली आहे.

अारोपी शिवम माधव फुलवळे (वय-२१, रा. वाघोली, पुणे, मु.रा. नांदेड), सुरेश शिवाजी इंदुरे (२३, रा. सकनूर, ता. मुखेड, नांदेड) व सागर रमेश जाधव (रा. हलकी, ता. शिरोळा, लातूर) या अारोपींना याप्रकरणी अटक करण्यात अाली अाहे. त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस कोठडी मिळण्यासाठी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी अारोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील रेणुका देशपंडे (कर्जतकर) यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, अारोपींनी गुन्हयात वापरलेली झूम कंपनीची किया सेल्टॉस कार तपासणी करण्यात आली त्यात केसाचे नमुने, लाईटर, रक्ताचे नमुने जप्त करण्यात आले आहे.

मयताचा व्हिसेरा तपासणी होऊन अभिप्राय मिळण्यासाठी न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांचेकडे पाठविण्यात अाला अाहे. मुख्य आरोपी शिवम फुलवळे याच्या राहते घराचे घरझडतीत बँकेचे पासिबुक, पॅनकार्ड, अाधारकार्ड, सहा सिमकार्ड, सहा केबल टाय स्ट्रीप जप्त करण्यात अाले अाहे. शिवम याने मयताचे खूनानंतर तिचे अंगावरी दागिने काढून घेत त्याच्या एका मित्राकडे लपवून ठेवले होते. तसेच तिच्या मोबाईल मधील सिमकार्ड काढून ते दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकून त्याद्वारे मयत मुलीचे पालकांना धमकीचे व नऊ लाखांचे खंडणीचे मेसेज करण्यात अाले. सदरचा गुन्हा हा उच्चशिक्षण घेत असलेल्या तरुण मुलांनी मुलीचे खंडणी व खुनासाठी अपहरण करुन खून करण्याचा गंभीर गुन्हा केलेला अाहे. त्यांचे इतर साथीदार कोण अाहे. अाणखी कोणत्या हत्यााराचा त्यांनी वापर केला, गुन्हा करण्यास अाणखी कोणते वाहन वापरले, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे याकरिता त्यांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली अाहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments