इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांच्या 25 टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या नियमित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 18 ते 24 मार्चदरम्यान प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी प्रतीक्षा यादीतील प्रवेशाचा शेवटचा दिवस आहे. प्रतीक्षा यादीत आतापर्यंत 3 हजारांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश 18 मार्चपासून सुरू करण्यात आले. पहिल्या प्रतीक्षा यादीत 3 हजार 2 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. नियमित आणि प्रतीक्षा यादी मिळून 72 हजार 743 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पालकांनी प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले.