इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात आज (रविवारी) मराठी विश्व साहित्य संमेलनात राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेता रितेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला आहे. या मराठी विश्व साहित्य संमेलनात मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेसाठी राज ठाकरे ज्या गोष्टी सांगितील त्या गोष्टींना मदत करू, असे आश्वासन दिले. सामंत यांच्या भाषणानंतर बोलताना राज ठाकरे म्हणाले ‘उदयजी आपण मदत करालच. पण आम्ही जे जे करू त्याला देखील आपण पाठींबा द्यावा, अशी आमची विनंती आहे. तेव्हा फक्त केसेस टाकू नका. आत्तापर्यंतच अनुभव सांगितला बाकी काही नाही. जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय मराठी भाषेसाठी करतोय. आमच्या आमच्या परीने करतोय.’ असे राज ठाकरे म्हणाले.
ठाकरे पुढे म्हणाले की, ‘माणसाचे अस्तित्व हे जमीनवर असते. आमचा इतिहास म्हणता पण इतिहास म्हणजे भूगोल. हा प्रदेश, जमीन पायाखालून सरकली तर तुमचे अस्तित्व राहत नाही. मराठी माणसांचे अस्तित्व असायला हवे ते आपण टीकावायला हवे, प्रगतीच्या नावावर जमीनी जात असतील तर तो विकास नसतो. आपलं अस्तित्व पुसण्याचा तो एक डाव असतो. इतिहासामधून बोध घेणार नसू तर इतिहास न वाचलेला बरा.’, असे देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मला त्या राजकारणात पडायचे नाही..
‘370 नंतर आत्ता जम्मू कश्मीरमध्ये जमीन घेता येते. मला त्या राजकारणात पडायचे नाही. पण तुम्ही हिमाचलमध्ये गेला, आसाम, मणिपूरमध्ये गेला तर तुम्हाला तेथे जमिनीचा एक तुकडा विकत घेता येत नाही. मग आपल्याकडेच ही मोकळीक का देण्यात आली आहे?. या आणि आमच्या जमिनी घ्या. मराठी भाषेसोबत मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी काय केले पाहिजे? हे सरकराने बघितले पाहिजे.’, असे आवाहन देखील राज ठकरे यांच्याकडून सरकारला करण्यात आले आहे.
साहित्यिकांनी बोलले पाहिजे राज ठाकरे म्हणाले की, साहित्यिकांनी मार्गदर्शन केले पाहिजे. साहित्यिकांनी बोललं पाहिजेत. मला कोणी आत्ता मत मांडताना दिसत नाही. साहित्यांनी फक्त पुस्तक लिहून चालणार नाही. चांगल काय वाईट काय हे सांगितले पाहिजे. जे साहित्यिक बोलतील त्यांचे पाहूनच वाचक पुस्तक घेणार आहे.