Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजआमदार राहुल कुल यांना विजयी करण्यासाठी महायुती एकवटली; चौफुला येथे महायुतीची समन्वयक...

आमदार राहुल कुल यांना विजयी करण्यासाठी महायुती एकवटली; चौफुला येथे महायुतीची समन्वयक बैठक संपन्न

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल कुल यांचा प्रचार करणार असून महायुतीचा धर्म पाळणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे आणि राष्ट्रवादी काँगेसच्या (अजित पवार गट) प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महायुतीतील घटक पक्षाची समन्वयक बैठक चौफुला येथे (दि.05 नोव्हेंबर) रोजी पार पडली.

दौंड विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगेस पक्षाकडून (अजित पवार गट) अधिकृत उमेदवार म्हणून वीरधवल जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीमध्ये बिघाडी होते की काय अशी चिन्हे निर्माण झाली होती. पण महायुतीमध्ये बिघाडी होऊ नये. यासाठी वीरधवल जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. याप्रसंगी जगदाळे म्हणाले की, दौंड तालुक्यामध्ये महायुती भक्कम असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने आमदार राहुल कुल यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे म्हणाल्या की, आम्ही पक्षाला मानणारे कार्यकर्ते असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने स्थानिक मतभेद दूर ठेवून महायुतीच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहोत.

यावेळी राहुल कुल म्हणाले, आमच्या विनंतीला मान देऊन वीरधवल जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला, त्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभारी आहोत. सर्वांना सोबत घेऊन पुढील काळात विकास कामे करणार असल्याची यावेळी त्यांनी सांगितले.

याप्रसंगी महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, प्रवक्त्या वैशाली नागवडे, महेश भागवत, नामदेव बारवकर, अशोक खळदकर, गुरुमुख नारंग, नितीन दोरगे, भाजपा तालुकध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments