Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजआमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखलः मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिस ठाण्यापुढे कार्यकर्त्यांसह ठिय्या...

आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखलः मतदानाच्या पूर्वसंध्येला पोलिस ठाण्यापुढे कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन करणे भोवले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोकसभा निवडणुकीत भाजपवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत पोलिस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन करणाऱ्या काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर व त्यांच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

रवींद्र धंगेकर यांनी पुण्याच्या सहकार नगर परिसरात भाजपने पैसे वाटल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी सायंकाळी सहकारनगर पोलिस ठाण्यापुढे आपल्या सहकाऱ्यांसोबत ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांवर भादंवि कलम 143, 147, 149 अंतर्गत तथा महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135 व लोकप्रतिनिधी अधिनियमचे कलम 126 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

रवींद्र धंगेकर यांच्या आंदोलनामुळे पुण्याचे वातावरण चांगलेच तापले होते. त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यापुढे जोरदार घोषणाबाजी केली होती. सहकारनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी धंगेकर यांना विनंती करुन, पोलिस ठाण्यासमोर जमीनीवर न बसता केबिनमध्ये येऊन खूर्चीवर बसावे, तसेच आपली लेखी तक्रार आमच्याकडे द्यावी त्यावर आम्ही निश्चितपणे कारवाई करू असे सांगितले. विशेषतः या प्रकरणी त्यांना पुरावे सादर करण्याचीही विनंती करण्यात आली. पण धंगेकर यांनी आपल्या आरोपाप्रकरणी तक्रारही दिली नाही किंवा पुरावेही दिले नाही.

रवींद्र धंगेकरांनी केवळ पैसे वाटल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील काहीजणांवर अटकेची कारवाई करण्याची तोंडी मागणी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीही धंगेकरांची विनवणी केली. तसेच अशाप्रकारे चुकीची कारवाई करता येणार नाही असे त्यांना समाजवून सांगितले. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

त्यातच भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊनधंगेकरांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी तसे निवेदनही सादर केले. पर्वती परिसरात धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांवर रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साड्या वाटप करणे, बेकायदा फलक लावण्याचा, आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे ते भाजपवर असे आरोप करत असल्याची बाब घाटे यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर याबाबत पोलिसांनी सहकारनगर पोलिस स्टेशन येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तसेच आचारसंहितेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments