Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजआमदार योगेश टिळेकरांच्या साथीने सर्वांगीण विकासासाठी काम करत राहणार

आमदार योगेश टिळेकरांच्या साथीने सर्वांगीण विकासासाठी काम करत राहणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

हडपसर : आजवर जनतेच्या विकासाचे ध्येय समोर ठेवूनच काम केले आहे. नागरिकांचे रस्ते, वीज, पाणी हे मूलभूत प्रश्न सोडविण्यासोबत त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने काम केले आहे. गुणवत्ता पूर्ण जीवनशैलीसाठी कार्यरत राहिलो आहे. येथून पुढेही विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या साथीने सदैव कार्यरत राहणार आहे, असे प्रतिपादन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांनी केले.

प्रचार पदयात्रेत ते बोलत होते. “स्व. विठ्ठल तुपे नाट्यगृहाच्या माध्यमातून हडपसरच्या सांस्कृतिक चळवळीला नवचेतना मिळाली आहे. पायाभूत सुविधांसह सांस्कृतिक व सामाजिक विकासाला देखील माझे प्राधान्य आहे. हे जनता जाणून आहे. म्हणूनच त्यांचे प्राधान्य मला आहे. महामहीम राष्ट्रपती महोदय यांच्याकडून मिळालेला उत्कृष्ट संसदपटू हा सन्मान हे त्याचेच द्योतक आहे. लोकांच्या साथीने मी पुढेच जाणार आहे,” असे चेतन तुपे यावेळी म्हणाले.

ही पदयात्रा व दुचाकी यात्रा शूरवीर येसाजी कामठे चौक मल्हार चौक, प्रतिभाताई शाळा, हनुमान आझाद चौक, भोलेनाथ चौक, शिवराज चौक, प्रतिभाताई शाळा, भगवा चौक, स्वराज चौक, लक्ष्मीनगर, हागवणे नगर, VIT कॉलेज, महावीर ईलाइट, बौद्ध विहार, आश्रप नगर, संत ज्ञानेश्वर नगर, काकडे वस्ती, महावीर चौक, शांतीनगर, मुळीक कॉर्नर, वंदे मातरम चौक, क्रांती चौक, गोकुळनगर पाण्याची टाकी, टीळेकर नगर, श्री जल सोसायटी, बधे नगर या भागातून पुढे गेली.

यावेळी विधानपरिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर, पुणे महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका रंजनाताई टिळेकर, मा. जि.प. अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी नगरसेवक वृषाली कामठे, माजी नगरसेवक विरसेन जगताप, राधाकीसन बधे, सुभाष बधे, शिवाजी मरळ, अशोक वाघ, वसंत कामठे, शामराव कामठे, माऊली कामठे, विश्वास समगिर, पांडुरंग हगवणे, प्रमोद दरेकर, शरद दांडेकर, कैलास थोरात, चिंतामण जगताप, गणेश जगताप, अनिल बाला कामठे, मधुकर मरळ, चंद्रकांत गायकवाड, रामदास नाना कामठे, अनिस भाई काजी, रमेश गायकवाड, राकेश कामठे, गौरव गायकवाड, सुनिल कामठे, संदीप बधे, अनिल येवले, उदयसिंह मुळीक, अमित ओसवाल, अमर आबा तुपे, पुनम पाटील, जया बोरा, स्मिता दातीर, नखाते ताई, सुमित केदासे संभाजी कामठे, रोहन कामठे, निनाद सनस यांच्यसह नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments