Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजआमदाराकडून त्रास, ग्रामसेवकाच्या पत्नीने औषध पेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न; तक्रार दाखल

आमदाराकडून त्रास, ग्रामसेवकाच्या पत्नीने औषध पेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न; तक्रार दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातुन धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे चक्क आमदाराने धमकावल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी महिलेनं विषारी औषध प्यायल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत, औषध प्राशन केलेल्या महिलेच्या भावाने तक्रार दाखल केली आहे. आमदार नितीन पवार यांच्याविरुद्ध ही तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे.

अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार या ग्रामसेवक असलेल्या पतीस खोट्या तक्रारी करून त्रास देतात म्हणून काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या शीतल महाजन यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कळवण येथे घडली आहे.

ग्रामसेवकाच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी चिठ्ठीत काय लिहिलं

शीतल महाजन यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आमदार नितीन पवार व त्यांची पत्नी जयश्री पवार यांच्या विरोधात काम केले असल्यामुळे शीतल महाजन यांच्या ग्रामसेवक पतीला खोट्या तक्रारी करून अटकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यांची अनेकवेळा चौकशी होऊनही तक्रारीत काहीही तथ्य आढळलेले नाही. तरीही, जाणीवपूर्वक त्रास देणे सुरूच होता, असे शीतल महाजन यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. याप्रकरणी महाजन यांचे बंधु योगेश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्यादी अर्ज अभोणा पोलिस स्थानकात दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments