इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी केली. त्यानंतर आता नामांतराचा वाद पेटण्याची शक्यता आहे. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे असी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली होती. आता त्यांच्या या मागणीला संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला असून पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला असून रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव यांचे नाव देण्याची मागणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. त्यानंतर आत वेगवेगळ्या संघटनांकडून वेगवेगळ्या मागण्या मांडल्या जात आहेत.
म्हणून फुलेंचं नाव
पुणे रेल्वे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव देण्यात यावे अशी आपली पूर्वीपासूनची मागणी आहे. पुणे हे संपूर्ण जगामध्ये विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्धीस आलं ते कोणामुळे ? शहराची ही ओळख महात्मा फुले यांनी निर्माण केली. आता आम्हाला आधुनिक पेशवाई नकोय. महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटावं असं क्रांतिकारी काम महात्मा फुले यांनी केलं असल्यामुळे त्यांचं नाव पुणे रेल्वे स्टेशनला देण्यात यावं. अशी मागणी संभीजी ब्रिगेड कडून करण्यात आली आहे.