इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : राज्यात गणेशोत्सवाची धामधूम असून काल (सोमवार) अनेक ठिकाणी सात दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. शहरातही गणरायाच्या विसर्जनाची तयारी जोरात सुरू होती. घरगुती तसेच काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांनाही काल निरोप देण्यात आला. लाडका गणराय घरी चालल्यामुळे अनेक लोक भावूक झाले होते. विसर्जनानिमित्त मोठी गर्दी असल्याने पोलिसांचाही तोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मात्र याच सणाच्या उत्साहाला गालबोट लावणारी एक घटना काल नवी मुंबईत (Navi Mumbai) घडली. तुर्भे येथे एका रिक्षा ड्रायव्हरने महिलेचा विनयभंग केल्याची आणि तिला शिवीगाळ केल्याची ( crime news) धक्कादायक घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री १० च्या सुमारास हा प्रकार घडला. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 24 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तुर्भे नाक्यावरून गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक जात होती. तेव्हाच मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका इसमाने पीडित महिलेचा हात पकडला आणि तिला शिवीगाळ केलील. त्यानंतर आरोपीने तिचा विनयभंगही करण्याचा प्रयत्न केला असता, तिने त्याला कडाडून विरोध केला आणि दोघांमध्ये जोरदार बाचाबाचीही झाली.
हा प्रकार घडल्यावर महिलेने लगेचच पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
ठाण्यातही घडला होता असा प्रकार
शहरातील महिलामविरोधातील गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ठाणे स्टेशनवरही दिवसाढवळ्या असाच प्रकार घडला होता. पीडित महिला जिना चढत असताना आरोपीनेन तिला एकदा नव्हे तर अनेकदा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.
तिने प्रथम त्याकडे लक्ष दिले नाही मात्र पुन्हा पुन्हा हा त्रास झाल्यावर तिने मागे वळून त्याला मोठ्याने जाब विचारला आणि स्टेशनवर गस्त • घालणाऱ्या पोलिसांच्या हवाले करत त्याच्याविरोधात तक्रारही दाखल केली.
पीडित महिला कल्याणची रहिवासी असून ठाणे येथील कंपनीत कामाला आहे. घनटेच्या दिवशी सकाळी तिने कल्याणहून ठाण्याला जाणारी लोकल पकडली. ठाणे स्टेशनवर उतरल्यानंतर ब्रिजच्या पायऱ्या चढताना आरोपीने तिच्या मागील बाजूस स्पर्श केला होता. मात्र तिने हरून न जाता, त्यालाच ठणकावले आणि पोलिसांतही दिले.