Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजआधी महिलेकडून घेतले उसने पैसे; ते परत करावे लागू नये, म्हणून त्यांच्याच...

आधी महिलेकडून घेतले उसने पैसे; ते परत करावे लागू नये, म्हणून त्यांच्याच मोबाईलमधील प्रायव्हेट पार्टचा फोटो व्हायरल करण्याची धमकी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ओळखीतून वेळोवेळी उसने घेतलेले पैसे आपल्याला परत करावे लागू नये, म्हणून एकाने महिलेचा मोबाईल चोरुन त्यातील अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहकारनगरमधील एका २८ वर्षाच्या महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. त्यानंतर अजय दादासाहेब देशमुख (रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीने त्यांची ओळख अजय देशमुख याच्याशी करुन दिली होती. तिकीट बुकिंग करण्याच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. त्यानंतर अजय देशमुख याने ऑगस्ट २०२१ मध्ये वडिल आजारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून २ लाख रुपये उसने घेतले. त्यानंतर गरज पडेल त्यावेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून एकूण ६ लाख ३० हजार रुपये उसने घेतले. ऑक्टोबर २०२१ मध्ये आरोपी अजय देशमुख हा फिर्यादी यांच्याकडे पैसे घेण्यासाठी आला, तेव्हा त्यांचा मोबाईल गहाळ झाला.

त्यानंतर फिर्यादी आरोपी अजयकडे पैसे परत देण्याची मागणी करु लागल्या. तेव्हा डिसेंबर २०२३ मध्ये अजयने फिर्यादींच्या इस्टाग्रामवर एक मेसेज करत फोटो पाठविला. त्यामध्ये फिर्यादी यांचे सिझरिंगचे इन्फेक्शन झालेले प्रायव्हेट पार्ट दिसत होता. फिर्यादी यांनी हा फोटो डॉक्टरांना दाखविण्यासाठी काढला होता. हा फोटो पाहून अजय यानेच आपला मोबाईल चोरल्याची फिर्यादींना खात्री पटली. पुन्हा २४ जुलै २०२४ रोजी आरोपी अजय देशमुख याने तो फोटो पाठवत गुगलवर व्हायरल करीन, असे लिहिलेले होते. उसने घेतलेले ६ लाख ३० हजार रुपये परत करावे लागू नये, म्हणून अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देशमुख यांनी दिली. या घटनेनंतर महिलेने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments