Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजआधी कोयत्याने वार, नंतर दगडाने ठेचून हत्या; मेहुण्यासमोरच केलं भयंकर कृत्य

आधी कोयत्याने वार, नंतर दगडाने ठेचून हत्या; मेहुण्यासमोरच केलं भयंकर कृत्य

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी- चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीची चाकू, कोयत्याने वार करून दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. निलेश अशोक भंडारी असं हत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. निलेश याचे अधिकृत ताडी विक्री करण्याचे दुकान आहे.

निलेश आणि त्याचा मेहुणा हे दोघे दुचाकीवरून घरी जात असताना त्यांना रस्त्यात अडवून हत्या केली आहे. ही घटना देहूगाव- तळवडे रस्त्यावर घडली असून पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. देहूरोड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश भांडरी हा अधिकृत ताडी विक्री करण्याचा व्यवसाय करायचा. त्याचा ओटास्कीम निगडी आणि देहू येथे अधिकृत ताडी विक्रीचा व्यवसाय आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास मेहुणा आणि मयत निलेश हे दोघे दुचाकीवरून देहूगाव येथे घरी येत होते.

त्यावेळी अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्यांच्या दुचाकीला धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर मेहुण्यासमोरच निलेशची धारदार चाकू, कोयत्याने वार करून आणि दगड, सिमेंटच्या गट्टूने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आरोपी हे फरार झाले असून देहूरोड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments