Sunday, December 10, 2023
Home क्राईम न्यूज आधी काकूवर चाकूने केला वार, नंतर भावालाही इजा, २० वर्षांच्या हल्लेखोराला...

आधी काकूवर चाकूने केला वार, नंतर भावालाही इजा, २० वर्षांच्या हल्लेखोराला तासाभरात अटक; पण त्याने असं केलं तरी का ?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मीरा-भाईंदर | 1 नोव्हेंबर 2023 : सध्या मुंबईत गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. अशीच एक घटना मीरा-भाईंदरमध्ये उघडकीस आली आहे. तेथे एका तरूणाने घरात घुसून त्याच्या काकूची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास मीरा-भाईंदरमधील क्वीन्स पार्क एरिआमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तासाभराच्या आतच अटक केली. जिशान खाने असे आरोपीचे नाव असून तो अवघा २० वर्षांचा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाना खान (३१) असे मृत महिलेचे नाव असून त्या आपल्या कुटुंबासह क्वीन्स अॅव्हेन्यू इमारतीत राहत होत्या. आरोपी जिशानहा त्याच परिसरात राहतो. सोमवारी दुपारी जिशना जबरदस्तीने शबाना यांच्या घरात घुसला आणि त्याने चाकूने त्यांच्यावर वार केले. एवढेच नव्हे तर घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी त्याने त्याच्या 11 वर्षीय चुलत भावाला (मृत महिलेचा मुलगा) इजा करण्याचा प्रयत्न केला. सोसायटीच्या सदस्यांनी धाव घेत जखमी शबाना हिला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. शबाना हिचा आधीच मृत्यू झाला होता, रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

का केली हत्या ?

” या हल्ल्याची आणि हत्येची माहिती मिळताच, आम्ही तातडीने विशेष पथके तयार केली आणि शोध घेऊन एका तासात भाईंदर (पश्चिम) येथून आरोपीला पकडले, असे पोलिसांनी सांगितले. अवघ्या २० वर्षांच्या या तरुणाने हे कृत्य नेमकं का केलं, काकूलर आणि त्यानंतर तिच्या मुलावरही वार का केले, या गुन्ह्यामागचा नेमका हेतू अद्याप समजू शकलेला नाही. मात्र पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी नमूद केलं.

हल्लेखोर जिशान याचे कुटुंबीय आणि हल्ल्यात मृत झालेल्या शबाना यांचे कुटुंबिय, दोघेही मूळ मध्य प्रदेशातील असून काही वर्षांपासून ते मीरा रोड येथील क्वीन्स पार्क परिसरात रहात होते. याप्रकरणी आरोपीविरुद्ध नवघर पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 302 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्यामागचा नेमका हेतू काय होता आणि आरोपीला कोणी मदत केली होती का, याचा तपास पथकाकडून सखोल तपास सुरू आहे. मात्र या हल्ल्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांनी अद्याप जप्त केलेला नाही. दरम्यान या घटनेने आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली.

RELATED ARTICLES

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : 'स्पार्कल कँडल' बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला....

Recent Comments