Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजआधी आर्मीमध्ये कामाला असल्याचे सांगितले, नंतर तरुणीला भेटण्यासाठी बोलावून जबरदस्तीने ठेवले संबंध,...

आधी आर्मीमध्ये कामाला असल्याचे सांगितले, नंतर तरुणीला भेटण्यासाठी बोलावून जबरदस्तीने ठेवले संबंध, गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर तरुणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२३ मध्ये हडपसर परिसरात घडला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. ३ जुलै) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजित संभाजी हुलवान (रा. पंचवटीनगर, खानापूर, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादीची सोशल मीडियावर ओळख झाली. आरोपीने आर्मीमध्ये कामाला असल्याचे सांगितले. तिला लग्नाचे आमिष दाखवून हडपसर परिसरात भेटण्यासाठी बोलावून घेतले. तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी त्याने मोबाईलमध्ये तरुणीसोबचे फोटो काढले. पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्नास नकार दिला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments