Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज आत्महत्येच्या प्रयत्नातील तरूणाला जीवदानः पोलिसांची सतर्कता आली कामाला; तर दुसऱ्या घटनेत...

आत्महत्येच्या प्रयत्नातील तरूणाला जीवदानः पोलिसांची सतर्कता आली कामाला; तर दुसऱ्या घटनेत हातचलाखीने महिलेचे दागिने चोरले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कौटुंबिक वादासह आर्थिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाला मुंढवा पोलिसांमुळे जीवदान मिळाले आहे. त्याला आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करीत पोलिसांकडून समजूत घालण्यात आले आहे. ही घटना २१ जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास घोरपडीतील कवडे रस्त्यावर घडली आहे अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.

विजय भाउ पासलकर (वय-३६) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. मुंढवा पोलिस ठाण्यातील अमलदार प्रवीण होळकर आणि जगदीश महानवर रविवारी ड्युटीला होते. त्यावेळी पोलीस नियंत्रण कक्षात तरूण आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याची माहिती फोनकॉल्सद्वारे त्यांना देण्यात आली. त्यानंतर दोघेही अमलदार तातडीने घोरपडीतील कवडे रस्त्यावर घटनास्थळी पोहोचले.

त्यावेळी विजय हा आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. त्यावेळी होळकर आणि महानवर यांनी विजयची समजूत घालून आत्महत्येपासून परावृत्त केले. त्याला पोलीस चौकीत आणून आत्महत्येचा कधीही विचार न करण्याचा सल्ला दिला. कौटुंबिक वादासह संपत्तीच्या वादावादीतून विजय आत्महत्या करणार होता. मात्र, वेळीच पोलीस नियंत्रण कक्षातील माहितीनुसार पोलीस अमलदारांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा जीव वाचविला आहे. मुंढवा पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे नागरिकांने कौतुक केले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त आर राजा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, अमलदार प्रवीण होळकर आणि जगदीश महानवर यांच्या पथकाने केली.

हातचलाखीने महिलेचे दागिने चोरले

सराफाकडे सोन्याचे दागिने दुरूस्त करण्यासाठी चाललेल्या जेष्ठ महिलेसोबत गप्पा मारून त्यांच्याकडील ३० हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मुंढव्यातील पिंगळे वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी ७० वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला जुने सोन्याचे दागिने घेउन सराफाकडे जात होती. वाटेत दम लागल्यामुळे महिला एकाठिकाणी बसली होती. त्यावेळी आलेल्या अनोळखी दोघा चोरट्यांनी त्यांच्यासोबत गप्पा मारत विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांची पिशवी खाली पडली आहे, अशी बतावणी केली. पिशवी देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करीत ३० हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पोलीस अमलदार एस शिवरकर पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments