Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजआता WhatsApp च्या माध्यमातून भरता येणार बिल; कंपनीकडून UPI Lite ची तयारी...

आता WhatsApp च्या माध्यमातून भरता येणार बिल; कंपनीकडून UPI Lite ची तयारी सुरु

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली : सध्या WhatsApp, Meta, X आणि इन्स्टाग्रामयांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. त्यात WhatsApp चा युजर मोठा आहे. असे असताना कंपनीकडूनही आपल्या युजर्सना अनेक बेस्ट असे फीचर्स देण्याचा प्रयत्न असतो. त्यात आता WhatsApp कडून UPI Lite आणण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

UPI Lite च्या माध्यमातून युजर्सना बिल पेमेंटचा पर्याय मिळू शकतो. याचा अर्थ असा की, लवकरच तुम्ही WhatsApp च्या मदतीने बिल पेमेंट करू शकता. हे फीचर गुगल पे, फोन पे सारख्या प्लॅटफॉर्मप्रमाणे दिले जाणार आहे. एका नवीन अहवालनुसार, WhatsApp लवकरच UPI Lite पेमेंट पर्याय आणू शकतो. WhatsApp UPI Lite बद्दल माहिती समोर आली आहे. हे UPI Lite शी संबंधित कोड स्ट्रिंग्स WhatsApp च्या v2.25.5.17 बीटा व्हर्जनमध्ये आढळून आले आहे. सध्या हे फीचर ट्रायल बेसवर आहे. सॅमसंग वॉलेट, PhonePe, GPay सारख्या इतर प्लॅटफॉर्मप्रमाणे WhatsApp देखील त्याचा एक भाग बनू शकते, असे म्हटले जात आहे.

व्हॉट्सअॅप UPI Lite पेमेंट सर्व्हर व्यस्त असताना देखील काम करेल, असे सांगण्यात येत आहे. युजर्सना लवकरच PIN-Free पेमेंटचा पर्याय मिळू शकणार आहे. UPI Lite फक्त मुख्य डिव्हाईसेसवर काम करणार आहे. म्हणजेच ते लिंक केलेल्या उपकरणांवर उपलब्ध होणार नाही, अशीही माहिती समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments