इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे सध्या मोठं आव्हान बनत आहे. कारण, अनेक आजार, आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होताना दिसत आहेत. त्यात हृदयविकाराची अनेक कारणे समोर आली आहेत. ही समस्या फक्त ज्येष्ठांनाच नाहीतर हल्ली अगदी लहान मुलांनाही जाणवताना दिसत आहे. त्यामुळे आहारात पोषक पदार्थांचा समावेश करणे हेच फायद्याचे ठरते.
तुम्ही तुमच्या लहान मुलांना हृदयविकासापासून वाचवू शकता. त्यासाठी फास्ट फूड आणि जंक फूड खाणे टाळले पाहिजे. त्यात पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज यांसारख्या जंक फूडमध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हृदयाच्या नसा ब्लॉक होतात. तसेच कोल्ड ड्रिंक्स आणि साखरयुक्त पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढून हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय, चिप्स, इन्स्टंट नूडल्स आणि पॅकेज्ड मिठाईमध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि मीठ जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या उद्भवतात.
समोसे, पकोडे इत्यादी पदार्थांमध्ये जास्त कॅलरीज आणि ट्रान्स फॅट्स असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढून हृदयावर दबाव येतो. प्रक्रिया केलेल्या आणि गोठवलेल्या पदार्थांमध्ये रसायने आणि पदार्थ असतात, जे शरीरात जळजळ वाढवून हृदयाच्या आरोग्यास हानी पोहोचवतात. त्यामुळे मुलांच्या आहारात ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पोषक फॅट्सचा समावेश करावा. याशिवाय, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक हालचाली वाढवल्या पाहिजे. मुलांना नियमितपणे मैदानी खेळ आणि शारीरिक हालचालींमध्ये सामील करावे, याने फायदा होऊ शकतो.
‘या’ गोष्टींपासून राहा दूर
जंक फूडपासून दूर राहावे. पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूडऐवजी घरगुती संतुलित आहार घ्यावा. नियमित आरोग्य तपासणी करावी. मुलांच्या हृदयाचे आरोग्य वेळोवेळी तपासा, जेणेकरुन कोणतीही समस्या वेळेत ओळखता येईल. या सर्व गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच हिताचे ठरू शकते.