Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज आठ महिन्यांत पुण्यात भीषण आगीच्या अनेक घटना, मृतांची संख्या... कोट्यावधी रुपयांचे नुकसान

आठ महिन्यांत पुण्यात भीषण आगीच्या अनेक घटना, मृतांची संख्या… कोट्यावधी रुपयांचे नुकसान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे | 8 डिसेंबर 2023 : पुणे शहरात गेल्या आठ महिन्यांपासून एकामागे एक आगीचे सत्र सुरु आहे. शहर आणि परिसरात एक, दोन महिन्याच्या कालावधीत भीषण आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आग लागली. या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. या भागात वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्त्या आणि फटाक्याचे गोदाम होते. त्या गोदामाला ही आग लागली. या गोदामात सगळ्या ज्वलनशील वस्तू असल्यामुळे आग वेगाने पसरली. काही कळण्याच्या आत आगीने संपूर्ण गोदाम व्यापले. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या कामगारांना निघण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यात सात जणांचा मृत्यू झाला. अजूनही काही कामगार अडकल्याची शक्यता आहे.

अनेक प्रश्नांची उत्तर शोधावी लागणार

पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथे फटाका गोदाम आहे. शुक्रवारी दुपारी या गोदामाला आग लागली. या गोदामाला परवाना होता का? त्या ठिकाणी ज्वलनशीर वस्तू असताना सुरक्षेची काळजी घेतली गेली होती का? सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? हे प्रश्न निर्माण झाले आहे. परंतु पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अनेक वेळा आग लागत आहे. यासंदर्भात काहीच उपाययोजना होत नाही. या आगीत मृतांची संख्या मोठी आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान गेल्या आठ महिन्यांत झाले आहे.

पुणे शहरात घडलेल्या आगीच्या घटना

• पुणे शहरातील वाघोलीत येथील गोडाऊनमध्ये चार सिलेंडर फुटले होते. मे महिन्यात महिन्यात लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला होता.

• जून महिन्यात मार्केट यार्डमधील हॉटेल रेवळ सिद्धी येथे लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला. जून महिन्यातच पुण्यातील टिंबर मार्केटमध्येही आग लागली होती. त्या आगीत प्रचंड नुकसान झाले होते.

पुन्हा जुलै महिन्यात कोंढवा येवलेवाडी येथील गोडाऊनला भीषण आग लागली.

• ऑगस्ट महिन्यात पिंपरी चिंचवडमधील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला.

ऑक्टोंबर महिन्यात गाडयांच्या शोरुमला आग लागली होती.

त्या आगीत २५ मोटारसायकल जळून खाक झाल्या. पुण्यातील वेस्टलैंड मॉलला रेस्टॉरंटमध्ये २३ नोव्हेंबर रोजी आग लागली. यावेळी मॉलमध्ये असणाऱ्या सात हजार लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments