Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज आज आनंदी आनंद झाला! या कंपन्या लावणार लॉटरी

आज आनंदी आनंद झाला! या कंपन्या लावणार लॉटरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली | 22 ऑक्टोबर 2023 पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांना किती सांगू आणि कोणाला सांगू असा अनुभव येणार आहे. अनेक कंपन्या त्यांचा लेखाजोखा मांडणार आहे. दुसऱ्या तिमाहीचे निकाल यायला लागले आहेत. गेल्या आठवड्यात काही कंपन्यांनी त्यांची कामगिरी सर्वांसमोर मांडली. त्यात लाभांश, बोनस शेअरची उधळण करण्यात आली. गुंतवणूकदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला. काहींना मोठी लॉटरी लागली. काही कंपन्या या आठवड्यात शेअरधारकांना आनंदाचा धक्का देतील. डिव्हिडेंड, बोनस आणि शेअर स्प्लिटच्या लाटेत गुंतवणूकदार हरकून जातील त्यांना मोठा फायदा होणार आहे.

या कंपन्या करतील मालामाल

या आठवड्यात आयसीआयसीआय लोम्बार्ड, एल अँडटी टेक, इन्फोसिस या कंपन्या एक्स डिव्हिडंडच्या माध्यमातून कमाईची संधी देतील. बाजारात अनेक कंपन्याच्या घाडमोडींना वेग आला आहे. या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकालात लाभांश, बोनस शेअर, शेअर स्प्लिटचे बक्षिस मिळू शकते. त्यासाठी तारीख निश्चित करण्यात येते. त्यालाच एक्स-डिव्हिडेंड डेट म्हणतात.

एक्स डिव्हिडेंड शेअर्सची यादी

1. इन्फोसिस (Infosys) : आयटी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या संचालक मंडळाने 18 रुपये प्रति शेअरचा लाभांश जाहीर केला आहे. हा शेअर 25 ऑक्टोबर रोजी एक्स-डिव्हिडंड देईल.

2. केसोल्व्स इंडिया लिमिटेड (Ksolves India Ltd): 7 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 26 ऑक्टोबर 13. टीसीआय एक्सप्रेस लिमिटेड (TCI Express Ltd) 3 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 26 ऑक्टोबर

4. एस्ट्रल लिमिटेड (Astral Ltd) 1.5 रुपयांचा अंतरिम

लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 27 ऑक्टोबर

5. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (ICICI Lombard General Insurance Company Ltd): 5 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 27 ऑक्टोबर

6. आयसीआयसीआय सिक्योरिटीज लिमिटेड (ICICI Securities Ltd) : 12 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स- डिव्हिडेंड डेट 27 ऑक्टोबर.

7. जिंदल स्टेनलेस लिमिटेड (Jindal Stainless Ltd): 1 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 27 ऑक्टोबर 8. एलटीआय माइंडट्री लिमिटेड (LTI Mindtree Ltd) : 20 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 27 ऑक्टोबर

9. एलअँडटी टेक्नोलॉजी सर्व्हिसेज लिमिटेड (L&T Technology Services Ltd) 17 रुपयांचा अंतरिम लाभांश, एक्स-डिव्हिडेंड डेट 27 ऑक्टोबर

बोनस आणि स्प्लिट शेअरची यादी

श्री व्यंकटेश रिफायनरीज लिमिटेड (Shri Venkatesh Refineries Ltd) चा शेअर 27 ऑक्टोबर रोजी एक्स-बोनस देईल. त्याचे प्रमाण 1:1 आहे. • जय भारत मारुती लिमिटेड (Jay Bharat Maruti Ltd) चा शेअर 26 ऑक्टोबर रोजी एक्स-स्प्लिट होईल. बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड (BCL Industries Ltd) 27ऑक्टोबर रोजी एक्स-स्प्लिट होईल. शशिजीत इंफ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड (Shashijit Infraprojects Ltd) एक्स-स्प्लिट होईल. • टेलब्रोज ऑटोमेटिव्ह कम्पोनेंट्स लिमिटेड (Talbros Automotive Components Ltd) शेअर रोजी एक्स- स्प्लिट होईल…

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments