इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली : 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालानवी दिल्लीत आजपासून सुरूवात होत आहे. या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार, संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे उपस्थित असणार आहेत.
सरहद या संस्थेकडून संमेलनाचं आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलं आहे. आज दुपारी साडेतीन वाजता दिल्लीत विज्ञान भवनात संमेलनाला सुरूवात होईल. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान विविध साहित्यिक कार्यक्रम या संमेलनात होणार आहेत. संमेलनासाठी दोन कोटींचा अतिरिक्त निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.
पंप्रधान मोदी, शरद पवारांसह फडणवीसही एकाच मंचावर
दिल्लीत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. तर, डॉ. तारा भावळकर संमेलनाध्यक्ष तर शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर एकत्र दिसणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.