इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
हैदराबाद : भारताच्या महत्वकांक्षी मिशन गगनयानची चाचणी स्थगित करण्यात आली आहे. लवकरच आम्ही मिशन गगनयान चाचणीची नवीन वेळ जाहीर करु, असं इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितलं. चाचणीसाठी लॉन्च व्हेइकल अवकाशात झेपावणार होतं, काऊंटडाऊन सुरु झालं होतं. अखेरची 5 सेकंद उरली असताना चाचणी उड्डाण रोखण्यात आलं. आधी फ्लाइट टेस्टिंगची वेळ 8 वाजताची होती. नंतर ती 8.30 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर खराब हवानामामुळे वेळ बदलून 8.45 करण्यात आली. लॉन्च व्हेइकल अवकाशात झेपावायला शेवटची 5 सेकंद उरलेली असताना मिशन स्थगित करण्यात आलं. मिशन गगनयान ही भारताची मानवी अवकाश मोहिम आहे. भारत 2025 साल आपले अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे. त्या दृष्टीने आजची चाचणी खूप महत्त्वाची होती. आज लॉन्चिंग नंतर लँडिंग बंगालच्या खाडीत होणार होतं आज मानवरहीत उड्डाणं होणार होतं.
“लॉन्च व्हेइकलमध्ये अपेक्षित इंजिन प्रज्वलन न झाल्यामुळे लॉन्चिंग स्थगित करण्यात आलं. नेमकं काय चुकलय त्याचा आम्ही अभ्यास करुन लॉन्चिंगच नवीन शेड्युलड जाहीर करु. तांत्रिक कारणांमुळे टीवी-डी 1 बूस्टरच उड्डाण नाही होऊ शकलं लॉन्च व्हेइकल पूर्णपणे सुरक्षित आहे” असं इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितलं.
आजच्या चाचणीत काय होणार होतं?
आजच्या टेस्टिंगमध्ये टेस्ट व्हेइकल क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टमला आकाशात घेऊन जाणार होतं.
17 किलोमीटर उंचीवर 594 किलोमीटरच्या वेगाने गेल्यानंतर क्रूमॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम वेगळी होणार होती.
त्यानंतर क्रू मॉड्यूलचे दोन पॅराशूट ओपन होणार होते. त्याद्वारे बंगालच्या खाडीत लैंडिंग होणार होतं.
मिशनचा टीवी-डी 1 बूस्टर श्रीहरिकोटापासून सहाकिलोमीटर अंतरावर बंगालच्या खाडीत पडणार होता.
क्रू मॉड्यूल श्रीहरिकोटापासून 10 किमी अंतरावर बंगालच्या खाडीत लँड करणार होतं. तिथून क्रू मॉड्यूल आणि एस्केप सिस्टमची रिकव्हरी होणार होती.
प्रत्यक्ष मिशन गगनयानला सुरुवात झाल्यानंतर काही गडबड झाली, तर भारतीय अवकाशवीरांना सुरक्षित पृथ्वीवर कसं आणायच हा आजच्या चाचणीचा उद्देश होता. अशा आणखी दोन चाचण्या होणार आहेत. कारण अवकाशवीरांना पृथ्वीवर सुरक्षित परत आणण हा मुख्य उद्देश आहे.