Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज आगीतील बाधितांची आता आश्वासनांनी पुन्हा होरपळ; पाच पैशांचीही मदत नाही

आगीतील बाधितांची आता आश्वासनांनी पुन्हा होरपळ; पाच पैशांचीही मदत नाही

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे: टिंबर मार्केटमध्ये २५ मे २०२३ च्या रात्री लागलेल्या आगीत बाधीत कुटुंबे व व्यावसायिकांना सरकारकडून वारेमाप आश्वासने मिळाली, मदत मात्र एका पैशाचीही अद्याप मिळालेले नाही. त्या नैसर्गिक आगीत १२ कुटुंबे व ७ व्यावसायिकांचे बरेच मोठे आर्थिक नुकसान झालेच, पण त्यानंतर आता आश्वासनांच्या आगीतही त्यांची होरपळच होते आहे.

भवानी पेठेतील टिंबर मार्केट (लाकूड बाजार) मध्ये वारंवार आग लागत असते. या मार्केटला लागूनच रहिवासी घरे आहेत. हा सर्व परिसर बराच जुना आहे. २५ मे ला अशीच आग लागली. त्यामध्ये ७ दुकानदार व १२ कुटुंबांच्या घराचे बरेच नुकसान झाले. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान झाले. अशी आग लागल्यानंतर लगेचच तिथे अधिकारी, पदाधिकारी यांच्या भेटीगाठी सुरू होतात, सांत्वन केले जाते व मुख्य म्हणजे बरीच आश्वासने दिली जातात.

या आगीनंतरही तेच झाले असे तेथील एक बाधित चेतन अगरवाल यांनी सांगितले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह बऱ्याच राजकीय व्यक्तींनी भेट दिली. जिल्हाधिकारीही आले. तिथेच बाधितांना त्वरीत मदत करण्याचा निर्णय झाला. अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झालेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत करण्याचा कायदा आहे. त्यानंतर पंचनामा वगैरे करून नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते व त्याप्रमाणे मंत्रीमंडळाकडे प्रस्ताव पाठवून मंजूरी घेत आर्थिक मदत केली जाते.

या आगीत तहसील स्तरावर पंचनामे झाले आहेत. भेटीदरम्यान मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही त्वरीत मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता ६ महिने होत आले तरीही सरकारदरबारी यावर काहीच हालचाल नाही. स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे सर्व बाधित संतापले असून आता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढूनच मागणी करण्यात येईल असे अगरवाल यांनी सांगितले ती वेळ येऊ द्यायचे नसेल तर तातडीने मदत केली जावी अशी बाधितांची मागणी असल्याचे अगरवाल म्हणाले.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments