Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज आक्षेपार्ह बॅनरवरून हिंदुत्ववादी संघटनेची एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांना मारहाण

आक्षेपार्ह बॅनरवरून हिंदुत्ववादी संघटनेची एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांना मारहाण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) विद्यार्थ्यांना मारहाण ( Pune ) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. FTII मधील विद्यार्थी संघटनांकडून बॅनर झळकवण्यात आले होते. त्यावर आक्षेप घेत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. या सगळ्या प्रकारानंतर आता पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

एफटीआयआयमध्ये विद्यार्थी संघटनांकडून वादग्रस्त बॅनरबाजी करण्यात आली. यामध्ये बाबरी मशिदीचा उल्लेख होता. अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर हे बॅनर लावण्यात आलं होतं. या वादग्रस्त बॅनरबद्दल हिंदुत्वादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना समजलं आणि या कार्यकर्त्यांनी एफटीआयआयमध्ये घुसून या बोर्ड लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे.

एफटीआयआय कॉलेजमध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, या वादानंतर संस्थेच्या आवारातून बाबरी मशिदीचा उल्लेख असलेला बॅनर काढण्यात (Pune) आला.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments