Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज आई-वडिलांचं सतत व्हायचं भांडण, वैतागून दोन बहिणींनी उचललं टोकाचं पाऊल, विष घेत

आई-वडिलांचं सतत व्हायचं भांडण, वैतागून दोन बहिणींनी उचललं टोकाचं पाऊल, विष घेत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लखनऊ | 4 सप्टेंबर 2023 : घरातलं वातावरण चांगलं, शांत नसेल तर त्याच्या लहान-मोठे सर्वांच्याच आयुष्यावर परिणाम होताना दिसतो. मुलं तर त्यामुळे भयभीत होतात. त्यांच्या मनावरही परिणाम होतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली असून तेथे कौटुंबिक वादाला कंटाळून (family dispute ) दोन बहिणींनी विषप्राशन (consumed poision) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिलभीतमध्ये रविवारी रात्री हा खळबळजनक प्रकार घडला असून त्या दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पूरणपूर पोलिस स्टेशन भागात ही धक्कादायक घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नगरसेवक असीम रझा यांच्या मुली, कशिश (वय 20) आणि मुन्नी (वय 18) या दोघींनीही रविवारी संध्याकाळी विषप्राशन केले. हे कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांना उपचारांसाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्या दोघींची प्राणज्योत मालवली. पोलिसांच्या सांगण्यानुसार, त्या दोघींच्या पालकांचे एकमेकांशी सतत वाद होत असत. कौटुंबिक कारणांवरून ते सतत भांडायचे. रविवारीदेखील त्यांचे असेच मोठे भांडण झाले. त्यांच्या मुली या भांडणाला अतिशय वैतागल्या होत्या, त्यांना वीट आला होता. म्हणूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलत विषप्राशन करून स्वतःचं जीवनच संपवलं, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, कुटुंबीयांनी सुरुवातीला पोलिसांना याप्रकरणी कोणतीही कारवाई करू दिली नाही. मात्र त्यानंतर परिसरात अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments