Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजआईवडील रागवल्याने नांदेड सिटीतून बेपत्ता झालेली मुलगी अखेर सापडली

आईवडील रागवल्याने नांदेड सिटीतून बेपत्ता झालेली मुलगी अखेर सापडली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाघोली – नांदेड सिटी येथून आईवडील रागवल्याने बेपत्ता झालेली 12 वर्षाची मुलगी अखेर रांजणगाव येथे सुखरूप सापडली. नांदेड सिटी येथून ती दुपारी दोन वाजता आईवडील रागवल्याने ती घरातून निघुन गेली होती. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वः ताहा तिच्या शोधासाठी वाघोलीत रात्री सव्वा दहा वाजता दाखल झाले. यामुळे वाघोलीला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

दुपारी दोन वाजता ती घरातून निघून गेल्यानंतर तिच्या आई वडिलांनी तिचा शोध घेतला. यानंतर तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. शिवभाऊ पासलकर यांनी तिचा फोटो त्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल केला. रात्री आठ वाजता तिला वाघोलीत असल्याचे एका तरुणाने कळविले.

तिने केसनंद फाट्यावर महाराष्ट्र वडापाव या गाडीवर वडा पाव खाल्याचेही समोर आले. यानंतर ती तेथून निघून गेली. तिला रिक्षा चालक लक्ष्मण खैरे यांनी आळंदी फाट्यावरून रिक्षात वाघोलीत आणले. त्यांनी तिची चौकशी केली. मात्र माझे वडील येणार असल्याचे तीने सांगितले. यामुळे त्यांनी तिला बस स्थानकावर सोडले. मुलगी हरविल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना कळाल्यानंतर ते सरळ वाघोलीत दाखल झाले.

यामुळे पुण्याचा पोलीस फोर्सच दाखल झाला. अखेर ती रांजणगाव येथे सुखरूप असल्याचे कळविले. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे हे तिला आणण्यासाठी रांजणगावला रवाना झाले. रांजणगाव येथून व्हिडीओ कॉलवर ती सुखरूप असल्याची खात्री पोलीस आयुक्त व तिच्या आईने केल्यानंतर आयुक्त परतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments