Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजआईच्या विजयासाठी मुलगी सरसावलीः बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती...

आईच्या विजयासाठी मुलगी सरसावलीः बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती प्रथमच प्रचारात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ कन्या रेवती सुळे या देखील आता प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. सोबत, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवारांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे देखील आहेत. रेवती सुळे आणि युगेंद्र पवार दोघेही सध्या बारामतीत पदयात्रा काढत सुप्रिया सुळेंचा प्रचार करत आहेत. आईच्या प्रचारार्थ लेक पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात उतरल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे.

दरम्यान मविआकडून खासदार सुप्रिया सुळे तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवारी लढवत आहेत. दोन्ही उमेदवारांच्या कुटुंबीयांकडून आपापल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ त्यांची कन्या रेवती सुळे यांनीही प्रचारात सहभाग घेतला असून, योगेंद्र पवार यांच्या समवेत त्यांनी आज बारामती शहरातून पदयात्रा काढली.

दादा सहज बोलून गेले- युगेंद्र पवार

अजित पवारांच्या आमदारीची स्वप्ने पडत असल्याच्या वक्तव्यावर अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार म्हणाले, मला आमदारकीची स्वप्ने पडत नाही माझ्या मनात देखील आलं नाही. सध्या मी प्रचार करत नाही. अजून मी आमदारकीचा विचार केला नाही. याचा गंभीरपणे विचार केला नाही. विचार करेल आणि घरातील सगळ्यांशी चर्चा करुन निर्णय घेईल. दादा सहज बोलून गेले. दादांची सगळीच वक्तव्ये गंभीर घ्यायची नसतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments